Advertisement

क्रिकेटचा 'गाॅड' आता काॅमिकचा 'हिरो'!


क्रिकेटचा 'गाॅड' आता काॅमिकचा 'हिरो'!
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली असली, तरी त्याचे चाहते किंचितही कमी झालेले नाहीत. त्याच्या चाहत्यांच्या नजरेत आजही सचिन क्रिकेटमधला 'देव' आहे. सचिनलाही या चाहत्यांचं महत्त्व चांगलंच ठाऊक असून त्याने आपल्या फॅन्सकरीता 'अ बिलिएन ड्रिम्स' हा सिनेमा तयार केला. या सिनेमालाही चांगला प्रतिसाद मिळाला आता सचिन कॉमिक बुकच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच्या फॅन्ससमोर येत आहे.

२५ पानांच्या या कॉमिक बुकचं प्रकाशन 'हेचेत इंडिया' ही प्रकाशन कंपनी करणार आहे. लहान मुलांना डोळ्यापुढं ठेवूनच हे कॉमिक बुक तयार करण्यात आलं आहे. या कॉमिक बुकमध्ये सचिनचे गाजलेले किस्से असतील.

रमाकांत आचरेकर सचिनचे गुरू. त्यांच्याविषयीचा उल्लेख देखील या काॅमिक बुकमध्ये असेल. अबालवृद्धांना हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल, असं मत 'हेचेत इंडिया'चे प्रकाशक ऑमस अब्राहम यांनी व्यक्त केलं.

१९९८ मध्ये शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सचिनने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताला अविस्मरणीय विजय मिळवता आला. हा सामना 'डेझर्ट स्टॉर्म' या नावाने ओळखला जातो. या सामन्याचा उल्लेख देखील या कॉमिक बुकमध्ये असेल.



हेही वाचा -

ट्विटरमुळे हैराण झाला सचिन!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा