Advertisement

शिवाजी पार्क लायन्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये पहिला विजय


शिवाजी पार्क लायन्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये पहिला विजय
SHARES

शिवम दुबेची अष्टपैलू कामगिरी अाणि ब्रविश शेट्टीच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे शिवाजी पार्क लायन्स संघाने मुंबई क्रिकेट असोसिएशन अायोजित (एमसीए) टी-२० मुंबई लीगमध्ये पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. शिवम दुबेने टी-२० मुंबई लीगमध्ये पाच विकेट्स मिळवण्याची करामत करतानाच, ट्रम्प नाइट्स मुंबई नाॅर्थ ईस्ट संघाला १५२ धावांवर रोखले. त्यानंतर ब्रविश शेट्टीने नाबाद ६० धावांची खेळी करत शिवाजी पार्क लायन्सला पाच चेंडू अाणि सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला.


दुबे-ब्रविशची मोलाची भागीदारी


मुंबई नाॅर्थ ईस्ट संघाचे १५३ धावांचे अाव्हान पार करताना शिवाजी पार्क लायन्सला अखेरच्या चार षटकांमध्ये विजयासाठी ४८ धावांची अावश्यकता होती. मात्र अाकाश पारकरच्या १७व्या षटकांत शिवम दुबे अाणि ब्रविश शेट्टी यांनी २० धावा चोपून काढल्या. त्यामुळे शिवाजी पार्क संघाला पाच चेंडू राखून हे अाव्हान सहज गाठता अाले. दुबे अाणि ब्रविश यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली ६३ धावांची भागीदारी शिवाजी पार्कसाठी मोलाची ठरली. दुबेने ४७ तर ब्रविशने दोन चौकार अाणि चार षटकारासह ६० धावा केल्या.


मुंबई नाॅर्थ ईस्टच्या फलंदाजांची हाराकिरी

प्रफुल्ल वाघेला अाणि सुमित घाडीगांवकर या दोन्ही सलामीवीरांनी मुंबई नाॅर्थ ईस्टला सावध पण अाश्वासक सुरुवात करून दिली. वाघेलाने ४२ तर घाडीगावकरने ३६ धावांची खेळी केली. त्यानंतर उतरलेला कर्णधार सूर्यकुमार यादवने ३४ धावा फटकावत अापल्या संघाला मजबूत स्थितीत अाणून ठेवले. १ बाद ११५ अशा स्थितीत असताना मात्र मुंबई नाॅर्थ ईस्टचा डाव गडगडला. पुढच्या ६.४ षटकांत अवघ्या ३७ धावांत त्यांनी अापल्या नऊ विकेट्स गमावल्या. त्यामुळे मुंबई नाॅर्थ ईस्टचा डाव १५२ धावांवर गडगडला. शिवम दुबेने पाच विकेट्स मिळवल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा