SHARE

मुंबईची धडाकेबाज फलंदाज अाणि भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधाना अापल्या अाक्रमक खेळामुळे लोकप्रिय अाहे. इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्ये वेस्टर्न स्टाॅर्म संघाकडून खेळताना स्मृती मंधानाने अापल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला अाहे. अवघ्या १८ चेंडूंत महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी तिने बरोबरी साधली अाहे.


वादळ धडकले

महिला क्रिकेटमधील पहिलीवहिली टी-२० लीग असलेल्या किया सुपर लीगमध्ये लाफबोरो लाइटनिंग संघाविरुद्धच्या सामन्यात पावसाने व्यत्यय अाणला. त्यामुळे सामना सहा षटकांचा खेळविण्यात अाला. मात्र स्मृतीने १९ चेंडूंत ५२ धावांची खेळी करत पाच चौकार अाणि चार षटकारांची अातषबाजी केली. तिने न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनने टी-२० मध्ये रचलेल्या सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.


सुरुवात, अर्धशतकही षटकाराने

स्मृती मंधानाने षटकार ठोकूनच अापल्या डावाची सुरुवात केली अाणि षटकार लगावूनच अर्धशतक साजरे केलं. विशेष म्हणजे, हा विक्रम अापल्या नावावर असलेल्या सोफी डिव्हाइनसुद्धा या सामन्यात लाफबोरो लाइटनिंगचे प्रतिनिधित्व करत होती. तिनेही २१ चेंडूंत ४६ धावा फटकावल्या, मात्र लाफबोरोला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला.


हेही वाचा -

थुकरटवाडीत अवतरणार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू

... तर अशी घडली क्रिकेटर पूनम राऊतसंबंधित विषय
ताज्या बातम्या