Advertisement

मेन इन ब्ल्यू घालणार भगवी जर्सी, अबू आझमींनी घेतला आक्षेप

‘मेन इन ब्ल्यू’ रविवारी इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. या भगव्या रंगाच्या जर्सीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा आरोप बुधवारी विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

मेन इन ब्ल्यू घालणार भगवी जर्सी, अबू आझमींनी घेतला आक्षेप
SHARES

निळ्या जर्सीत मैदानात उतरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला ‘मेन इन ब्ल्यू’ असंही म्हटलं जातं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपसाठी खास डिझाईन केलेली जर्सी घालून सध्या टीम इंडियाचे खेळाडू मैदान गाजवत आहेत. परंतु हे ‘मेन इन ब्ल्यू’ रविवारी इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. या भगव्या रंगाच्या जर्सीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा आरोप बुधवारी विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

भगवी जर्सी का?

म्हणजे सध्या वर्ल्ड कप खेळणाऱ्या काही संघाची जर्सी एकसारख्याच रंगाची आहे. त्यामुळे जेव्हा हे संघ एकमेकांसोबत सामना खेळतील तेव्हा मैदानात दोन्ही संघाचे खेळाडू एकाच रंगाच्या जर्सीत दिसतील. असं होऊ नये म्हणून वर्ल्ड कपचं आयोजन करणाऱ्या इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल (ICC)ने यंदाच्या वर्ल्डकपसाठी होम आणि अवे ही संकल्पना राबवली आहे. 

म्हणून 'हा' रंग

त्यानुसार इंग्लंड आणि भारत अशा दोन्ही संघाची जर्सी निळी असल्याने होम टीम अर्थात इंग्लंड त्यांच्या मूळ निळ्या रंगाच्या जर्सीतच मैदानात उतरलेत, तर होम टीम म्हणजेच भारताला भगव्या रंगाची जर्सी घालून खेळावं लागेल. 

भारताच्या निळ्या रंगाच्या जर्सीत भगव्या रंगाची छटा असल्याने अवे जर्सीसाठी भगवा रंग निवडल्याचं आयसीसीच्या सुत्रांनी सांगितलं. अफगाणिस्तानच्या जर्सीमध्येही निळ्या रंगाचा समावेश असल्यामुळे त्यांच्यासाठी लाल रंगाची छटा असलेली जर्सी तयार करण्यात आली होती.

रंगावर आक्षेप 

भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या देशाचा पराभव केल्यास मला आनंद होतो. परंतु मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशाच्या तिरंग्यात मुसलमानांचा हिरवा रंगही आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय क्रिकेट संघाला रंग द्यायचाच असेल, तर देशाच्या तिरंग्याचा रंग द्या. परंतु प्रत्येक गोष्ट भगव्या रंगात रंगवणार असेल तर ते अयोग्य आहे. देशासमोर चुकीचा संदेश जात आहे, तसंच जनतेने याचा विरोध करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं.



हेही वाचा-

लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने केली अँजिओग्राफी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा