Advertisement

सनराईज हैदराबादला धक्का, अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर

सनराईज हैदराबादला आता मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

सनराईज हैदराबादला धक्का, अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर
SHARES

सनराईज हैदराबादला आता मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही. गोलंदाजीदरम्यान मार्शला दुखापत झाल्याने तो हंगामातून बाहेर पडणार असल्याचं ट्विट सनराईज हैदराबादने अधिकृतरित्या त्यांच्या ट्विटरवरून केलं आहे.

ट्विटमध्ये म्हटलं की, मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आलं आहे.

राॅयल चँलेजर्स बंगळुरू विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मार्शला गोलंदाजीची संधी दिली. सामन्यातलं पाचवं षटक टाकत असताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. यानंतर त्याने फिजीओच्या मदतीने उपचार घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याला गोलंदाजी करता आली नाही. अखेरीस विजय शंकरने मार्शचं उरलेलं षटक पूर्ण केलं. तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. पण त्याला धावण्यास अजिबातच जमत नसल्याने पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.हेही वाचा  -

आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं मोडला 'हा' विक्रमसंबंधित विषय
Advertisement