Advertisement

दुखापतीमुळं 'या' खेळाडूची आयपीएलमधून माघार

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला आता एक मोठा झटका बसला आहे.

दुखापतीमुळं 'या' खेळाडूची आयपीएलमधून माघार
SHARES

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला आता एक मोठा झटका बसला आहे.  हैदराबादचा महत्त्वाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून माघार घेतली आहे. दुखापतग्रस्त झाल्यामुळे आणि हिप इंज्युरीमुळं तो भुवनेश्वर आयपीएलमधून बाहेर पडला आहे. 

मागील आठवड्यामध्ये हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सामना होता. या सामन्यात अखेरचं षटक टाकताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. त्याचवेळी तो मैदानातून बाहेर गेला होता. रविवारी मुंबईविरोधातील सामन्यातही तो नव्हता. 

रविवारच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं भुवनेश्वर पुढील काही सामने खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता तो आयपीएलमधूनच बाहेर पडला आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत आता गोलंदाजीची मदार राशिद खान आणि टी नटराजन यांच्यावर असेल. मुख्य म्हणजे भुवनेश्वरनं आयपीएलमधून घेतलेली माघार भविष्यात भारतीय संघासाठीही अडचणीची ठरु शकते. आयपीएल नंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता त्यासाठी नेमकी काय आखणी केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



हेही वाचा -


रोहित शर्माचा आयपीएलमध्ये रेकाॅर्ड, ५ हजार धावा करणारा तिसरा बॅट्समन

मराठमोळ्या दिग्वीजय देशमुखला झहीर खानचं मराठीतून प्रशिक्षण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा