Advertisement

रोहित शर्माचा आयपीएलमध्ये रेकाॅर्ड, ५ हजार धावा करणारा तिसरा बॅट्समन

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लिग (IPL) मध्ये ५००० धावांचा पल्ला गाठला आहे.

रोहित शर्माचा आयपीएलमध्ये रेकाॅर्ड, ५ हजार धावा करणारा तिसरा बॅट्समन
SHARES

मुंबई इंडियन्सने गुरूवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४८ धावांनी मात केली. ही मॅच जिंकून मुंबई इंडियन्स पाॅईंट्स टेबलमध्ये थेट पहिल्या स्थानावर जाऊन बसली. परंतु या मॅचमध्ये आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला. तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लिग (IPL) मध्ये ५००० धावांचा पल्ला गाठला. 

रोहित शर्माने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खूश केलं. मागील काही वर्षांपासून रोहितच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे त्याने या विक्रमाला गवसणी घातली. रोहितने आयपीएलमधील १९२ मॅच खेळून ५,०६८ धावा जमवल्या आहेत. यामध्ये ३८ अर्ध शतकांचा समावेश आहे.  

रोहित शर्मा सोबतच ५ हजार धावांपर्यंत मजल मारणारे इतर दोन खेळाडू देखील भारतीयच आहेत. सुरेश रैना आणि भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली अशी त्यांची नावं आहेत. सुरेश रैनाने १९३ आयपीएल मॅच खेळून ५३६८ धावा काढलेल्या आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्जकडून १६४ मॅच खेळताना त्याने ४५२७, तर गुजरात लायन्सकडून २९ मॅच खेळताना ८४१ धावा त्याने केल्या आहेत. आयपीएलच्या तेराव्या सीझनमधून सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव बाहेर आहे.

हेही वाचा- मराठमोळ्या दिग्वीजय देशमुखला झहीर खानचं मराठीतून प्रशिक्षण

तर राॅयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने या दोघांपेक्षा कमी १८० मॅच खेळून ५४३० धावा केल्या आहेत. राॅयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. 

किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्ध झालेल्या सामन्यात देखील रोहित शर्माने कर्णधाराला साजेसी खेळी केली होती. ४५ चेंडूत ७० धावा करून त्याने मुंबई इंडियन्सला २० ओव्हरमध्ये १९१ धावांचा पल्ला गाठून दिला होता. त्याच आधारे किंग्ज इलेव्हनवरील दबाव वाढवत त्यांना दुसऱ्या इनिंगमध्ये २० ओव्हरमध्ये १४३/८ वर रोखून पराभूत केलं होतं. 

सध्या मुंबई इंडियन्स पाॅईंट्स टेबलमध्ये टाॅपवर असून मुंबई इंडियन्सची पुढील मॅच रविवार ४ आॅक्टोबरला सनरायझर्स हैदराबादसोबत शारजा इथं होणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा