Advertisement

IPL 2021 : 'हे' ५ खेळाडू मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले असून, यंदाचं जेतेपद कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले असून, यंदाचं जेतेपद कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय, यंदाच्या आयपीएलमध्ये काही खेळाडू मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळं हे खेळाडू विक्रम करणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

विराट कोहली

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. विराटनं आतापर्यंत ५ हजार ८७८ धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये विराटला सहा हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी विराटला फक्त १२२ धावांची गरज असून, हा पल्ला पार केल्यास आयपीएलमध्ये विराट ६ हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरेल.

एबी डिव्हिलियर्स

आयपीएल २०२१ मध्ये एबीला खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत ४ हजार ८४९ धावा केल्या आहेत. या वर्षी १५१ धावा केल्यास तो ५ हजार धावांचा टप्पा गाठेल. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावा करणारा तो सहावा फलंदाज ठरले.

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आयपीएलच्या १४व्या हंगामात मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या वर्षी गेलनं एक षटकार मारल्यास आयपीएलमध्ये त्याचे ३५० षटकार पूर्ण होणार आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरले. गेलने १३२ सामन्यात ४ हजार ७७२ धावा केल्या आहेत आणि ३४९ षटकार मारले आहेत.

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं आयपीएलमध्ये आतापर्यंत ४८ अर्धशतक केली आहेत. या वर्षी २ अर्धशतक करताच तो स्पर्धेच्या इतिहासात ५० अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरले.

शिखर धवन

आयपीएलमध्ये टीम इंडियातील या सलामीवीराने आतापर्यंत ५९१ चौकार मारले आहेत. आणखी ९ चौकार मारता त्याचे ६०० चौकार पूर्ण होतील. स्पर्धेत ६०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरेल.



हेही वाचा -

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंत

कोरोनाग्रस्त सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा