Advertisement

रोनित ठाकूरच्या नाबाद शतकामुळे वेंगसरकर संघ मजबूत स्थितीत


रोनित ठाकूरच्या नाबाद शतकामुळे वेंगसरकर संघ मजबूत स्थितीत
SHARES

टोटल वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीनं आयोजित १४ वर्षांखालील निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोनित ठाकूरच्या (नाबाद १००) नाबाद शतकी खेळीमुळं वेंगसरकर संघानं गावस्कर संघाविरुद्धच्या सामन्यात सर्वबाद १६० धावा केल्या. दुसऱ्या साखळी लढतीत पाहुण्या विदर्भ संघानं तेंडुलकर संघाला ११० धावांत गुंडाळलं.


गावस्कर संघाची प्रभावी फिरकी

ओव्हल येथील लढतीत वेंगसरकर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण गावस्कर संघाच्या फिरकी गोलंदाजांसमोर त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र तनय खानदेशी (२६) आणि रोनित ठाकूर हे मात्र त्याला अपवाद ठरले. रोनितनं १६१ चेंडूंचा सामना करत नाबाद १०० धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गावस्कर संघानं बिनबाद ८ धावा केल्या होत्या.


तेंडुलकर संघाच्या ११० धावा

सचिवालय जिमखाना येथील दुसऱ्या लढतीत सचिन तेंडुलकर संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चांगलाच महागात पडला. फिरकी गोलंदाज गौरव फर्डे (२६/३), आदित्य तितरमारे (१६/३) आणि चैतन्य पोडल्लीवर (१७/२) यांनी त्यांना केवळ ११० धावांतच गुंडाळलं. सचिन सरोज (२०), आदित्य रावत (३५) आणि प्रतिक वारंग (२३) या तिघांनीच थोडाफार प्रतिकार केला. पहिल्या दिवसाअखेर विदर्भ संघानं सावध फलंदाजी करीत १९ षटकांत १ बाद ३१ धावा केल्या अाहेत.


हेही वाचा -

कसोटीतून 'टाॅस' होणार हद्दपार?

लालचंद राजपूत बनले झिम्बाब्वेचे हंगामी प्रशिक्षक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा