Advertisement

दिल्लीच्या कर्णधारपदावरून गौतम गंभीर पायउतार, मुंबईकर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व


दिल्लीच्या कर्णधारपदावरून गौतम गंभीर पायउतार, मुंबईकर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व
SHARES

अायपीएलमधील खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत गौतम गंभीर यानं अायपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला अाहे. अाता उर्वरित अायपीएलमध्ये मुंबईकर श्रेयस अय्यरकडं नेतृत्वाची धुरा सोपवण्यात अाली अाहे. जानेवारी महिन्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने गंभीरवर बोली लावली होती. जेतेपदाचा दुष्काळ गंभीरच संपवेल, असे दिल्लीला वाटत होते. पण सहा सामन्यांत पाच पराभवांनिशी दिल्ली डेअरडेव्हिल्सची तळाच्या स्थानी घसरण झाल्यामुळे गंभीरनं कर्णधारपदावरून पायउतार होण्याचे ठरवले.


दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या खराब कामगिरीला मीच पूर्णपणे जबाबदार अाहे. त्यामुळेच मी कर्णधारपदावरून पायउतार होत अाहे. अाता श्रेयस अय्यर संघाचं नेतृत्व सांभाळणार अाहे. दिल्ली संघ अद्यापही मोठी मुसंडी मारेल, असा विश्वास मला वाटत अाहे. मीच संघासाठी योगदान देऊ शकलो नाही. त्यामुळेच मी स्वत: हा निर्णय घेतला अाहे.
- गौतम गंभीर, दिल्ली डेअरडेव्हिलचा फलंदाज


नेतृत्व सांभाळण्यास सज्ज – श्रेयस

अायपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सांभाळणारा २३ वर्षीय श्रेयस अय्यर हा ११वा खेळाडू ठरला अाहे. पुढील अाव्हानांसाठी मी सज्ज अाहे. अाज दुपारीच मला ही बातमी समजली. संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी मी सज्ज असून सर्वांनीच माझ्यावर विश्वास दाखवला अाहे. अाव्हाने स्वीकारायला मला अावडतात. अाता स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची संधी मला मिळाली अाहे, असे श्रेयस अय्यरने सांगितले.

 

रिकी पाँटिंग काय म्हणाले...

मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना २०१३ च्या मोसमात मीसुद्धा कर्णधारपदावरून पायउतार झालो होतो. अाता दिल्लीचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर कोणतेही दडपण असणार नाही. श्रेयसला भक्कम पाठिंबा देण्याची जबाबदारी अाता अामच्या सर्वांची अाहे. पुढील सामन्यासाठी अद्याप अवकाश असल्यामुळे अाम्ही तयारी करत अाहोत. कर्णधाराच्या सांगण्यावरूनच पुढील रणनीती ठरवली जाणार अाहे, असे दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी सांगितले.


दिल्लीची अायपीएलमधील वाटचाल

दिल्ली डेअरडेव्हिल्सने अद्याप एकदाही अायपीएलचे जेतेपद पटकावले नसले तरी २००८ अाणि २००९ मध्ये त्यांनी अायपीएलच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. तीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली अाहे. २०१० मध्ये दिल्ली संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. गेल्या दोन मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले अाहे.


हेही वाचा -

मुंबई इंडियन्सचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, पाचव्यांदा पराभवाची नामुष्की

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा