Advertisement

मिचेल स्टार्कची सलग तिसऱ्या वर्षी अायपीएलमधून माघार


मिचेल स्टार्कची सलग तिसऱ्या वर्षी अायपीएलमधून माघार
SHARES

अाॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे अायपीएलमधून माघार घेतली अाहे. त्याच्या या निर्णयामुळे कोलकाता नाइट रायडर्सला (केकेअार) अायपीएलच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला अाहे. या दुखापतीमुळे स्टार्क दक्षिण अाफ्रिका अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात जोहान्सबर्ग इथं सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही खेळू शकला नाही.


मिचेल स्टार्कच्या उजव्या पायाच्या हाडाला दुखापत झाली अाहे. त्यामुळे तो उपचारासाठी मायदेशी परतला अाहे. दुखापतीमुळे तो अायपीएलमध्येही खेळू शकणार नाही.
- क्रिकेट अाॅस्ट्रेलिया


सलग तिसऱ्यांदा अायपीएलला मुकणार

अाॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्टार्कच्या नशिबी गेल्या तीन वर्षांपासून अायपीएलमध्ये खेळण्याचा योग अालेला नाही. गेल्या वर्षी त्याने अांतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी असलेला करार मोडीत काढला होता. २०१६ मध्ये पायाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे तो खेळू शकला नव्हता. अाता पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली अाहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा