Advertisement

अवघ्या 18 व्या वर्षात पृथ्वीचे तीन शतक


अवघ्या 18 व्या वर्षात पृथ्वीचे तीन शतक
SHARES

मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने तामिळनाडू विरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन करत शतक ठोकले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शॉचे हे तिसरे शतक आहे. हा सामना मंगळवारी वांद्रे येथील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर रंगला  होता.

या शतकासोबतच शॉने आपले नाव एक विशेष यादीत नोंद केले आहे. त्याचे वय अजून 18 पूर्ण नसताना त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपले तीन शतक ठोकून चमकदार कामगिरी केली आहे. यामुळे तो लोकप्रीय झाला असून क्रिकेटप्रेमी त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणत आहेत. 


पण सचिन पृथ्वी शॉच्या पुढे

पण सचिन यामध्ये शॉ च्या पुढे आहे. सचिनने 18 वर्षाआधीच 8 फर्स्ट क्लास शतक बनवले होते. त्यानंतर अंबती रायडूचा नंबर लागतो. रायडूने 18 व्या वर्षात 4 शतक नोंदवले होते. आता त्यानंतर शॉ आणि अंकीत बावनेचा नंबर लागत आहे. या दोघांनी 18 व्या वर्षात 3-3 शातक लगावले होते. रणजी सामन्यात पृथ्वी पहिल्यांदा खेळत आहे. देशातील सर्वात युवा खेळाडू म्हणून सध्या पृथ्वी शॉकडे पाहिले जात आहे. यावर्षी पृथ्वीने रणजी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफीमध्ये डेब्यू केला. या दोन्ही सामन्यात त्याने शतक ठोकाले आहेत.



हेही वाचा - 

मुंबईकर पृथ्वी शॉचे दुलीप ट्राॅफीत पदार्पणातच शतक, सचिनच्या रेकाॅर्डशी बरोबरी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा