सांताक्रूझ परिसरात ३६ वर्षीय इसमाने १० वर्षांच्या मुलावर शारीरिक आत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत विजय शिंदे नावाच्या इसमाला अटक केली आहे.
मंगळवारी रात्री वाकोला परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. तिथे विजय शिंदेची नजर १० वर्षांच्या मुलावर पडली. त्याने मुलाला आमिष दाखवून शेजारी सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेलं आणि त्यानंतर मुलावर शारीरिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या मुलाने विजय शिंदेला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून तिथून पळ काढला.
एका रहिवाशाने मुलाला पाळताना बघितलं आणि विजय शिंदेला देखील ओळखलं. याच रहिवाशाने घडलेला प्रकार मुलाच्या घरच्यांना सांगितला. याबद्दल घरच्यांनी मुलाला विचारताच मुलगा रडायला लागला आणि त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता मुलाच्या कुटुंबीयांनी वाकोला पोलीस ठाण्यात अनसर्गिक अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच वाकोला पोलिसांनी विजय शिंदेला अटक केली.
बुधवारी विजयला कोर्टात हजार केलं असता कोर्टाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा-
वाढदिवसाचा बॅनर फाडल्याने साकीनाकामध्ये तरुणाची हत्या
पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या