शाहरूख खानच्या बर्थडे पार्टीमध्ये 13 मोबाईलची चोरी!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा वाढदिवस त्याच्या वांद्रे येथील बंगल्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. रात्रीपासूनच त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती. मात्र, याच गर्दीचा फायदा चोरांनी उचलला असून, इथे मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी झाल्याचं समोर आलं आहे.

शाहरूख खानच्या बर्थडे पार्टीमध्ये 13 मोबाईलची चोरी!
SHARES

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा वाढदिवस त्याच्या वांद्रे येथील बंगल्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. रात्रीपासूनच त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती. मात्र, याच गर्दीचा फायदा चोरांनी उचलला असून, इथे मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी झाल्याचं समोर आलं आहे.

आत्ता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख खानच्या तब्बल १३ चाहत्यांचे फोन चोरी झाल्याच्या तक्रारी वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक चाहत्यांनी यावेळी तक्रार न करण्यास पसंती दिल्याचं देखील समजतंय.

अंकित साहू नावाचा २६ वर्षीय तरुण हा छत्तीसगडवरून मित्रांसोबत आपल्या लाडक्या अभिनेत्याला बघण्यासाठी आला होता. यावेळी गर्दीत त्याचा फोन चोरी झाला. यावेळी अंकितसोबत इतर १२ चाहत्यांच्या मोबाईलची चोरी झाल्याचं वांद्रे पोलिसांनी सांगितलं आहे.

गुरुवारी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ५२ वा वाढदिवस सजरा केला. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी मुंबईतूनच नव्हे, तर देशभरातून चाहते आले होते. बुधवार रात्रीपासूनच चाहते मन्नतवर जमण्यास सुरवात झाली होती, चाहत्यांची ही गर्दी गुरुवारी देखील कायम होती.हेही वाचा

बॅण्ड स्टॅण्डच्या खडकात तरुणीवर बलात्कार

मौजमजेसाठी ही लहान मुलं करायची दुचाक्यांची चोरी!

संबंधित विषय