COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

विक्रोळीत १६७ किलो गांजा पकडला

एएनसीच्या घाटकोपर युनिटनं त्याठिकाणी सापळा रचला होता. या दोघांच्या संशयास्पद हालचालींचा पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी त्यांच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता, तौफिककडील तीन बॅगांमध्ये १३० किलो गांजा आढळून आला तर परवीनकडील बॅगेत १५ किलो गांजा होता.

विक्रोळीत १६७ किलो गांजा पकडला
SHARES

मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकानं विक्रोळी परिसरातून तब्बल १६७ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात अालेल्या आरोपींमध्ये एका १९ वर्षीय तरुणाचा व ४० वर्षीय महिलेचा सहभाग अाहे. तौफिक रफिक खान (१९), परवीन कसमाली जाफरी अशी या दोघांची नावं आहेत.


गांजाच्या डिलिव्हरीसाठी विक्रोळीत

हे दोघंही एका खासगी टूरिस्ट गाडीतून गांजाच्या डिलिव्हरीसाठी विक्रोळी लिंक रोड परिसरात येणार असल्याची माहिती एएनसीच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एएनसीच्या घाटकोपर युनिटनं त्याठिकाणी सापळा रचला होता. या दोघांच्या संशयास्पद हालचालींचा पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी त्यांच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता, तौफिककडील तीन बॅगांमध्ये १३० किलो गांजा आढळून आला तर परवीनकडील बॅगेत १५ किलो गांजा होता. तर उरलेला २२ किलो गांजा कारमध्ये मिळाला. या दोघांवरही एएनसी पोलिसांनी एनडीपीआरएस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवत अटक केली आहे.


पालघरमधून अाणला गांजा

तौफिक हा नालासोपारातील एका अपार्टमेंटमध्ये राहत असून त्यानं पालघरमधून हा गांजा आणल्याचं प्राथमिक तपासात समोर अालं अाहे. परवीन साकिनाकाच्या ९० फीट रोडवरील दुर्गा माता मंदिर, सत्यानगर इथं राहते. पोलिसांनी हस्तगत केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ३३ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली. हे अंमली पदार्थ त्यांच्याकडे कुठून अाले आणि ते कशापद्धतीनं अंमली पदार्थांची मुंबईत विक्री करतात, याचा पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा -

गुजरातमध्ये दुसऱ्या संशयित दहशतवाद्याला अटक

...आणि रॉय म्हणाले 'पुलिस का काम होता है लडना!'Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा