गुजरातमध्ये दुसऱ्या संशयित दहशतवाद्याला अटक

गुजरातच्या कच्छ परिसरात खासगी वाहन चालक म्हणून काम करत असलेला अल्लारखाँ मागील अनेक दिवसांपासून फारूख आणि फैझल या दोघांच्या संपर्कात होता. पोलिसांना असा संशय आहे की, तो देखील फैझलसोबत पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आला आहे. हे दोघेही पाकिस्तानमधून येणाऱ्या पुढील सूचनेसाठी थांबले होते. या दोघांसह अन्य एका संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

गुजरातमध्ये दुसऱ्या संशयित दहशतवाद्याला अटक
SHARES

दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईहून पाकिस्तानमध्ये गेलेल्या फैझल मिर्झाच्या सहकाऱ्याला गुजरातमधून अटक करण्यात बुधवारी दहशतवादी विरोधी पथकाला यश आलं. अल्लारखाँ अबूबकर मन्सूरी (३२) असं त्याचं नाव आहे. फैझलसह तो देखील फारूखच्या संपर्कात असल्याचं पुढं आल्याने पोलिसांनी त्याला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे.

दोघेही फारूखच्या संपर्कात

गुजरातच्या कच्छ परिसरात खासगी वाहन चालक म्हणून काम करत असलेला अल्लारखाँ मागील अनेक दिवसांपासून फारूख आणि फैझल या दोघांच्या संपर्कात होता. पोलिसांना असा संशय आहे की, तो देखील फैझलसोबत पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आला आहे. हे दोघेही पाकिस्तानमधून येणाऱ्या पुढील सूचनेसाठी थांबले होते. या दोघांसह अन्य एका संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

कट उधळण्यात यश

फैझलच्या अटकेनंतर दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. २०१९ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात घातपात करण्याच्या प्रयत्नात हे दोघे होते. या घातपाती कारवाईसाठी अंडरवर्ल्ड, इंडियन मुझाहिद्दीन आणि आयएस या तिन्ही संघटना एकत्र आल्या होत्या.

२५ मे पर्यंत पोलिस कोठडी

देशातील तीन महत्वाच्या राज्यांमध्ये म्हणजेच भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये या प्रशिक्षण घेऊन आलेल्यांना दहशतवाद्यांना घातपाती कारवाई करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या तीन राज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि यूपीचा समावेश आहे. न्यायालयाने अल्लारखाँ याला २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा-

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला दुबईत अटक

एटीएसने ISISच्या वाटेवरील ११८ जणांना रोखलं, २० जण मुंबईतलेRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा