नाल्यात पडून १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

अंधेरी पश्चिमेकडील (Andheri west) ओशिवरा (oshiwara) परिसरातील आदर्श नगर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात (Drain) पडून एका १८ वर्षीय तरूणीचा मृत्यू (death) झाला आहे.

नाल्यात पडून १८ वर्षीय मुलीचा मृत्यू
SHARES

अंधेरी पश्चिमेकडील (Andheri west) ओशिवरा (oshiwara) परिसरातील आदर्श नगर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात  (Drain) पडून एका १८ वर्षीय तरूणीचा मृत्यू (death) झाला आहे.  कोमल जयराम मंडल (१८) असं या मृत मुलीचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. 

मंगळवारी रात्री आठच्या वाजताच्या सुमारास ओशिवारातील (oshiwara) मेगा मॉलजवळील आदर्श नगरच्या एका नाल्यात कोमल पडली.  त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तब्बल ७ तास शोध घेतल्यानंतर ती सापडली. तिला तात्काळ नाल्यातून बाहेर काढत जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. ओशिवरा येथील मेगा मॉलजवळ कोमल राहते. 

मुंबईत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर उघडे असलेले मॅनहोल (Manhole) अनेकदा मृत्यूचे सापळे बनले आहेत. या तरुणीचाही मृत्यू मॅनहोलमध्येच पडून झाला. या आधीही मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका लहान मुलाचाही नाल्यात पडून अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. त्यानंतर उघडे असलेले मॅनहोल बंद करण्याचं काम मुंबई महापालिने  हाती घेतलं होतं. 


हेही वाचा -

मुंबईतील हवा अधिक दूषित, वांद्रे आणि नवी मुंबईचा पहिला नंबर

एलबीएस मार्ग होणार १०० फुटांचा, ७९ बांधकामं पाडली
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा