अबु सालेमला का नाही झाली फाशी?


अबु सालेमला का नाही झाली फाशी?
SHARES

मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाने अवघ्या देशाला हादरवले होते. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. १३ मार्च १९९३च्या बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटात कुणी आपली आई, कुणी वडील, कुणी बहीण गमावली. अनेक जण जखमी झाले. त्या जखमा आजही भरलेल्या नाहीत.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी ७ आरोपींपैकी ६ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. मुस्तफा डोसा, अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. या सहा आरोपींपैकी मुस्तफा डोसा याचा हृदयविकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला. अबु सालेमसह इतर चार आरोपींना टाडा कोर्टाने गुरुवारी शिक्षा सुनावली. यामध्ये अबू सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेप, फिरोज खानला आणि ताहिर मर्चंटला फाशीची तर रियाज सिद्दीकीला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली



मुंबई बॉम्बस्फोटात हात असल्याने अबु सालेमला फाशीची शिक्षा होईल अशी आशा नागरिकांना होती. पण जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने नेटिझन्सने देखील नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी ट्वीट करून अबु सालेमला फाशी का नाही सुनावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 




अबू सालेमला फाशी का नाही?

बॉम्बस्फोट प्रकरणी सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध होऊनही अबु सालेमला फाशीची शिक्षा देता आली नाही. याचं कारण म्हणजे अबु सालेमला असलेली प्रत्यार्पण कायद्याची सुरक्षा. २००२ साली अबू सालेमला बनावट पासपोर्टप्रकरणी पोर्तुगाल पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर २००५ मध्ये त्याला पोर्तुगालकडून भारताच्या स्वाधीन करण्यात आले. अबू सालेमचे २००५ साली पोर्तुगालकडून प्रत्यार्पण करण्यात आले. मात्र त्यावेळी सालेमला फाशीची शिक्षा देता कामा नये, अशी अट पोर्तुगाल सरकारकडून घालण्यात आली. अबु सालेमने पोर्तुगालचे नागरिकत्व स्विकारले होते आणि पोर्तुगालमध्ये फाशीची शिक्षा नसल्यामुळे ही अट घालण्यात आली होती.



नाइलाजास्तव जन्मठेपेची शिक्षा

प्रत्यार्पण कायद्यामुळे नाइलाजास्तव जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी टाडा कोर्टात करण्यात आली. कोर्टात युक्तीवादादरम्यान अॅडव्होकेट साळवी यांनी अबू सालेमचे कृत्य फाशीच्या योग्य असल्याचे म्हटले. पण प्रत्यार्पण कायद्यातल्या तरतुदीमुळे त्याच्यासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करता येणार नाही, असे कोर्टात सांगण्यात आले.



हेही वाचा

13/7 बॉम्बस्फोट : 'त्यांना' जगण्यासाठी हवाय भक्कम आधार...


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा