चित्रपटातल्या गाड्या माॅडिफाय करणारे पोहोचले जेलमध्ये


चित्रपटातल्या गाड्या माॅडिफाय करणारे पोहोचले जेलमध्ये
SHARES

कर्ज फेडण्यासाठी ३ जी मोटारसायकलचे ४ जीमध्ये रुपांतर करण्याची शक्कल लढवून फसवणूक करणाऱ्या दोघा गॅरेज चालकांना गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी अटक केली अाहे. दुचाकींचा चेसी क्रमांक बदलून चोरीच्या १०० गाड्या त्यांनी अातापर्यंत विकल्याचे तपासात पुढे अाले अाहे. इतकंच नव्हे तर रणवीर सिंग अाणि अर्जुन कपूर यांची भूमिका असलेल्या 'गुंडे' चित्रपटातील तीनचाकी मोटारसायकलही अासिफ खान यानेच बनवल्याचे समोर अाले अाहे.


अपग्रेड करण्याच्या नावाखाली फसवणूक

सध्या बाजारात होंडा अॅक्टिव्हाच्या नव्या गाड्यांची चलती आहे. त्यातच होंडाच्या ३जी आणि ४जी या नव्या माॅडेलसाठी लोक अाग्रही अाहेत. जुन्या गाड्या अपग्रेड करून देण्याच्या नावाखाली वांद्रेतील मॅकेनिक आरिफ व साहिल हे लोकांची फसवणूक करायचे. नागरिकांकडून जुन्या गाड्या घेत, रस्त्यावरील नव्या चोरीच्या गाड्यांची चेसी व इंजिन त्या गाड्यांना बसवून बक्कळ पैसे ते कमवत होते. अवघ्या काही हजारांत नवीकोरी गाडी मिळत असल्याने दोघांच्या गॅरेजबाहेर नागरिकांची रीघ लागायची.


होंडा शोरूमच्या मालकाची तक्रार

या दोघांच्या या फसवणुकीची माहिती वांद्रेतील होंडा शोरूमच्या मालकाला मिळाली होती. त्यानुसार त्याने कंपनीची, नागरिकांची आणि सरकारची होणारी फसवणूक लक्षात घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन, हा गुन्हा नंतर गुन्हे शाखा ९च्या पोलिसांकडे वर्ग केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना अटक केली असून आतापर्यंत या दोघांकडून चोरीच्या २१ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. अारोपींनी चोरीच्या १०० गाड्या विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला अाहे.


हेही वाचा -

एअरपोर्ट पोलिस ठाण्यातली 'मर्दानी'

परळमधील मटका केंद्राचा 'घडा' भरला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा