COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

Exclusive विकासक लकडावालाने खाल्लेली बिर्याणी पोलिस अधिकाऱ्यांना महागात पडली

लकडावालाच्या कुटुंबियांनी त्याला बिर्याणी खाण्यास देण्याची विनंती केली. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला बिर्याणी खाण्यास परवानगी दिली. याच दरम्यान लकडावाला शौचालयात गेला असता. त्याने चेहऱ्यावर उगवलेली दाढीही काढली. आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर लकडावालाच्या चेह-यावर उगवलेली छोटी दाढी वरिष्ठांना दिसली नाही.

Exclusive विकासक लकडावालाने खाल्लेली बिर्याणी पोलिस अधिकाऱ्यांना महागात पडली
SHARES

खंडाळा येथे ५० कोटी रुपयांच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावालाने खालेली बिर्याणी आर्थिक गुन्हे शाखेतील दोन पोलिस अधिकार्यांना महागात पडली. कायदेशीर कारवाईसाठी लकडावालाला घरी नेहल्यानंतर घरी बिर्याणी खाण्यास आणि दाढी करण्यास परवानगी दिल्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.


काय आहे नेमकं प्रकरण

बनावट कागदपांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर(५० कोटी किमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला(७४) वर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात लकडावाला देशसोडून लंडनला पळ काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुजरातमधून त्याला अटक केली लकडावालाने मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.


दोन पोलिस कर्मचारी निलंबित

या गुन्ह्यात कागदोपत्री तपासासाठी दोन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी लकडावाला याला त्यांच्या  वांद्रे कार्टररोड येथील घरी नेले होते. घरात पोलिसांची झाडाझडती सुरू असताना. लकडावालाच्या कुटुंबियांनी त्याला बिर्याणी खाण्यास देण्याची विनंती पोलिसांजवळ केली. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला बिर्याणी खाण्यास परवानगी दिली. याच दरम्यान लकडावाला शौचालयात गेला असता. त्याने चेहऱ्यावर उगवलेली दाढीही काढली. आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर लकडावालाच्या चेह-यावर उगवलेली दाढी वरिष्ठांना दिसली नाही. त्यावेळी चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वरिष्ठांनी पोलिस कर्मचारी विलास राठोड व संदीप सावंत या दोन अधिका-यांवर निलंबंनाची कारवाई केली. तसेच आर्थिक गुन्हे शाखेत लकडावाला विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास कक्ष-९ चे पोलिस करत होते. त्या कक्षाकडून हा तपास काढून घेत, या गुन्ह्याचा तपास आता जनरल चिटींग-१ कडे सोपवण्यात आला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा

बनावट सर्टीफिकीट प्रकरणी डाँक्टर अटकेत

आयपीएल मॅचदरम्यान सट्टा खेळणाऱ्या ५ जणांना अटकRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा