मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीसोबत जीवघेणा प्रसंग, विनयभंग करत धावत्या लोकलबाहेर फेकण्याचा प्रयत्न

आठगाव स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावतच डब्ब्यात चढले. दोन्ही तरुण मद्यधुंद्य अवस्थेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली.

मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीसोबत जीवघेणा प्रसंग, विनयभंग करत धावत्या लोकलबाहेर फेकण्याचा प्रयत्न
SHARES

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने तिला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघाजणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून एकाला अटक केल्याचे कळते. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचाः- राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कसाऱ्यातील रहिवासी असून ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरीला आहे. कामानिमित्ताने ती कसारा ते ठाणे लोकलने प्रवास करायची. दरम्यान, बुधवारी म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी ही तरुणी नेहमीप्रमाणेच ड्यूटी संपल्यानंतर ठाण्याहून लोकलने कसाऱ्याला जात होती. ज्यावेळी ही तरूणी महिला डब्ब्यात बसली, त्यावेळी अनेक महिला तिच्यासोबत प्रवास करत होत्या. परंतु, आठगाव स्थानक गेल्यानंतर डब्बा रिकामा झाला. डब्ब्यात तरुणी एकटीच होती. आठगाव स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावतच डब्ब्यात चढले. दोन्ही तरुण मद्यधुंद्य अवस्थेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली. तिने लगेच मोबाईलवर दोघांचे फोटो काढून तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले. याचदरम्यान, दोघा जणांनी तिची विनयभंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरुणीने शेवटपर्यंत त्या तरुणांचा प्रतिकार केला. या झटापटीत दोघांनी तिला धावत्या लोकलमधून खाली फेकून देण्याचाही प्रयत्न केला आहे. लोकल स्थानकात येताच एक तरुण पसार झाले. तर दुसऱ्या आरोपीला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा