चेंबूरमधील बारवर पोलिसांची धाड, कॅव्हिटीत सापडल्या २३ बारबाला


SHARE

चेंबूर येथील नटराज बारवर पोलिसांनी अचानक धाड टाकत २३ महिलांसह १६ वेटर्स आणि तब्बल ५२ ग्राहकांना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बार मॅनेजरला देखील पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांच्या धाडीनंतर तीन छुप्या खोलीत तेथील बार डान्सर्सला लपवण्यात आलं होतं.


ज्यावेळी त्या बारवर धाड टाकली तेव्हा तिथे अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बारवर टाकण्यात आलेल्या वृत्ताला मुंबई पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी दुजोरा दिला आहे.


टिळक नगर पोलिसांची कारवाई

नटराज बार हा वेळेच्या मर्यादेनंतरही सुरू असल्याची तक्रार टिळक नगर पोलिसांना प्राप्त झाली होती. याची तक्रार मिळाल्यानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी नटराज बारवर धाड टाकली.

झोन सहाचे डीसीपी शहाजी उमप आणि झोन सातच्या डीसीपी अखिलेश सिंग यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली होती.
या धाडीदरम्यान बार मॅनेजरसह २३ महिला डान्सर्स, १६ वेटर्स, ऑरकेस्ट्रा वाजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर बारमधील ५२ ग्राहकांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संबंधित विषय