मुंबईच्या मालाड परिसरातील एका रुग्णालयात मलम लावण्याच्या बहाण्याने वार्डबाँयने २४ वर्षीय मुलीच्या प्रायव्हेटपार्टला हात लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मुकेशस प्रजापती नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
हेही वाचा:- रात्रीच्या संचारबंदीतही रिक्षा-टॅक्सी सुरू राहणार
मालाड परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय मुलीला मागील अनेक दिवसांपासून मुळव्याधीचा त्रास होत होता. या व्याधीवर उपचार करण्यासाठी ती रुग्णालयात दाखल झआली होती. मंगळवारी रात्री तिचे आँपरेशन होणार होते. त्याच्या आदल्या दिवशी आरोपी वार्डबॉय प्रजापती हा पीडितेच्या खोलीत गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला ऑपरेशन पूर्वी डॉक्टरांनी औषध लावण्याचे सांगितले आहे, असं आरोपी प्रजापती याने पीडित तरुणीला सांगितले. त्या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या प्राईव्हट पार्टला स्पर्श केला. घडलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणीने हॉस्पिटलमध्ये आरोपी विरोधात आरडाओरडा केला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रजापती याच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी प्रजापतीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.