Advertisement

रात्रीच्या संचारबंदीतही रिक्षा-टॅक्सी सुरू राहणार

रात्रीच्या संचारबंदीत रिक्षा-टॅक्सी वाहतुकीवर निर्बंध नसून पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक प्रवासी वाहतूक करण्याची मुभा आहे.

रात्रीच्या संचारबंदीतही रिक्षा-टॅक्सी सुरू राहणार
SHARES

रात्रीच्या संचारबंदीत रिक्षा-टॅक्सी वाहतुकीवर निर्बंध नसून पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक प्रवासी वाहतूक करण्याची मुभा आहे. विमान, रेल्वे, एसटी, खासगी बस यांतून रात्री उशिरा तसंच, पहाटे लवकर येणाऱ्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सीची सुविधा संचारबंदीच्या काळात उपलब्ध राहणार आहे. येत्या काळात नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष रेल्वेसह एसटी आणि खासगी बसमधून देखील प्रवाशांची वर्दळ सुरू आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संचारबंदीपूर्वी सुरू असलेली वाहतूक संचारबंदीच्या काळातही कायम राहणार आहे. यामुळं मुंबईत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत येणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून घरी जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सींतून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. रेल्वे-बसमधून येणारा प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याबाबत अधिक स्पष्टता आणणं गरजेचं होतं.

सध्या लागू झालेल्या संचारबंदीत पूर्वीप्रमाणं अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यास मुभा असल्याची सूचना प्रशासनानं केल्याचं टॅक्सी संघटनेचे ए. एल. क्वाड्रोस यांनी स्पष्ट केलं. रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ तूर्त टळली असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रिक्षा-टॅक्सींचा प्रस्ताव चर्चेसाठी येऊ शकला नाही. त्यामुळं आगामी बैठकीत यावर चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा