वाढदिवस साजरा करणं पडलं महागात

मित्रांनी हरीसचा २५ वा वाढदिवस २५ केक कापून साजरा करण्याचं ठरवलं. हरीसने यावेळी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

वाढदिवस साजरा करणं पडलं महागात
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लाॅकडाऊन (Lockdown) आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. मात्र वांद्रे येथे एका तरुणाने त्याचा २५ वा वाढदिवस २५ केक कापून
मोठ्या दणक्यात साजरा केला. यावेळी तो रहात असलेल्या इमारतीच्या टेरेसवर ३० हून अधिक जणांची उपस्थित होती. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी (Bandra police) गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हे' तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता

हल्लीच्या तरुणाईमध्ये तलवारीने किंवा कोयत्याने जन्म दिवसाइतके केक कापण्याचे नवीनच फॅड दिसून आले आहे. मात्र हे फॅड चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने साजरी करणं हरीस खान या तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. शनिवारी हरीसचा वाढदिवस होता. त्याने तो रहात असलेल्या इमारतीच्या टेरेसवर त्याच्या मित्रांना आमंत्रित केलं होते. त्यावेळी मित्रांनी हरीसचा २५ वा वाढदिवस २५ केक कापून साजरा करण्याचं ठरवलं. हरीसने यावेळी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. 

हेही वाचाः- रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, ७ जणांना अटक

त्या व्हिडिओत ३० हून अधिक तरुण पार्टीला असल्याचं दिसून येत आहे.  त्यातील अनेकांनी मास्कही घातलेलं नव्हतं. या व्हिडिओचा माग काढून पोलिसांनी हरीस विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात १८८, २६९, ३४,४,२५, आणि हत्यार बंदी कायदा १९५९ नुसार ३७(१), १३५ नुसार गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा