26/11 Attack : मुंबई हल्ल्यांनंतर समुपदेशकांचे महत्त्व कळाले

मुंबई हल्ल्यानंतर आणीबाणीच्या स्थितीत दहशवाद्यांशी मध्यस्थी अथवा समुपदेशन करण्यासाठी शालिनी शर्मा यांना परदेशात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले होते

26/11 Attack : मुंबई हल्ल्यांनंतर समुपदेशकांचे महत्त्व कळाले
SHARES

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी परदेशी नागरीकांना ओलीस धरले होते. त्यावेळी मुंबईपोलिस दलात समुपदेशक उपस्थित नसल्यामुळे परिस्थिती हाताळणे फार कठीण झाले होते.  मुंबई हल्ल्यानंतर आणीबाणीच्या स्थितीत दहशवाद्यांशी मध्यस्थी अथवा समुपदेशन करण्यासाठी शालिनी शर्मा यांना परदेशात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले होते. आता मुंबई पोलिसांकडे समुपदेशकांची फौज उभी राहिली आहे. मुंबई हल्ल्यानंतर मुंबई पोलिस दलात हा प्रमुख बदल झाला.

हेही वाचाः- 26/11 Mumbai attack : राज्यात बॉम्बनाशक पथकांचे चार प्रस्ताव सरकारी लाल फितीत

रफिक अहमद किडवाई मार्ग(आरएके) पोलिसांच्या हद्दीत वडाळा पश्‍चिम येथील २० मजल्याच्या निर्माणाधीन विष्णूचंद्र स्काय ब्लू इमारतीत तीन वर्षांपूर्वी मे महिन्यात हा प्रकार घडला. त्यात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही तरुणी या इमारतीच्या १८ व्या मजल्यावर चढली होती. उडी मारण्यापूर्वी ती मोबाईलवर चित्रफीत तयार करत असताना स्थानिक एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या तरुणीला समजवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश न आल्यामुळे अखेर चेंबूर पोलिस ठाण्यात कार्यरत व समुपदेशन तज्ज्ञ असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक शालिनी यांना बोलावण्यात आले. त्या घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी संबंधीत महिलेला समजवण्यास सुरूवात केली. अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी चारच्या सुमारास या तरुणीला समजवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन खाली आणले. शर्मा आता स्वतः मुंबई पोलिसांच्या अनेक कर्मचा-यांना समुपदेशनाचे धडे दिले आहे. त्यातून समुपदेशन करणा-यांची फौज मुंबई पोलिस दलात निर्माण झाली आहे.

हेही वाचाः- 26/11 mumbai attack : सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सायबर गुन्ह्यात मुंबई २ क्रमांकावर

मुंबई हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी परदेशी नागरीकांना ओलीस धरले होते. त्यावेळी मुंबईपोलिस दलात समुपदेशक उपस्थित नसल्यामुळे परिस्थिती हाताळणे फार कठीण झाले होते. मुंबई हल्ल्यानंतर मुंबई पोलिस दलात हा प्रमुख बदल झाला. त्यातून एका पथकाला परदेशात समुपदेशनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यातील अनेक अधिकारी आता समुपदेशनाचे धडे घेत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात समुपदेशनाचे प्रशिक्षण घेतलेला एक तरी पोलिस असावा ही या मागचा उद्देश आहे. त्यातून आणीबाणीच्या स्थितीत मध्यस्थी करून परिस्थीती योग्यरित्या हाताळता येईल.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा