नायर रुग्णालयातील २६ वर्षीय डाॅक्टरची आत्महत्या

त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते तीन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये गेले होते. रविवारी ते औरंगाबाद इथून परतले. सोमवारी त्यांनी दिवसभर काम देखील केलं.

नायर रुग्णालयातील २६ वर्षीय डाॅक्टरची आत्महत्या
SHARES

मुंबईतील नायर रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  या डॉक्टरचा मृतदेह त्यांच्या खोलीत सापडला. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

डॉ. तुपे असं या डॉक्टरांचं नाव होतं.  अॅनेस्थेशिया विभागात ते एमडीचे शिक्षण घेत होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते तीन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये गेले होते. रविवारी ते औरंगाबाद इथून परतले. सोमवारी त्यांनी दिवसभर काम देखील केलं. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन आत्महत्या केली. एका अंमली पदार्थाचं सेवन करत त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. डॉ. तुपे यांनी एवढं कठोर पाऊल उचलण्यामागचं कारण काय असेल याचा शोध पोलीस घेत आहेत. 



हेही वाचा -

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा