अंधेरीच्या डान्सबारमधून २९ मुलींची सुटका


अंधेरीच्या डान्सबारमधून २९ मुलींची सुटका
SHARES

अंधेरी परिसरातील रामभवन बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं रविवारी मध्यरात्री धडक कारवाई करत २९ बारबालांची सुटका केली. बारमध्ये काम करणाऱ्या १८ जणांना पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, बारमधून पोलिसांनी सुमारे ६३ हजार रुपये जप्त केले आहेत.


अवैधरित्या सुरू असतो बार

अंधेरीच्या पंचायत रोडवरील रामभवन बार रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरू असतो. बारमधील महिला त्या परिसरात येणाऱ्या ग्राहकांसोबत अश्‍लील वर्तन करत असतात. याबाबतची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकानं रविवारी रात्री १च्या सुमारास या बारवार कारवाई केली.


२९ बारबाला सापडल्या

या छाप्यात पोलिसांना बारमध्ये २९ बारबाला सापडल्या. महिलांसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या ९ ग्राहकांनांही पोलिसांनी ताब्यात घेतलं अाहे. यावेळी बारचा मॅनेजर, कॅशियर, वेटर आणि ग्राहक अशा १८ जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन केलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

VJTIच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिस तक्रार दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा