खळबळजनक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिघा नराधमांनी तिला रात्रीच्या अंधारात पीएमजीपी काँलनीजवळ आणून सोडले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत. तिघांनी पळ काढला.

खळबळजनक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
SHARES

तरुणीवर चालत्या कारमध्ये तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार मानखुर्द परिसरात उघडकीस आला आहे. एकट्या तरुणीला लिफ्ट देण्याच्या नावाखाली  आरोपींनी तिच्यावर बळजबरी केली. तसेच याची वाश्चता कुठे केल्यास परिणाम वाईट होतील असेही धमकावले. या प्रकऱणी मानखुर्द पोलिसांनी तिघा जणांना शिवाजीनगर परिसरातून अटक केली आहे.

हेही वाचाः- Exclusive अफगाणिस्तानातून आणलेलं १ हजार कोटींचे हेराॅईन न्हावाशेवा बंदरावर पकडलं

मानखुर्द परिसरात पीडित १५ वर्षाची मुलगी सध्या तिच्या मावशीकडे राहते. २९ जुलै रोजी रात्री साडे-दहाच्या सुमारास पीडित मुलगी मानखुर्द-घाटकोपर लिंकवरून पीएमजीपी काॅलनीत राहणाऱ्या मावशीकडे निघाली होती. पीडित मुलीला एकटे पाहून कारमधून जाणाऱ्या आरोपींनी तिच्याजवळ कार थांबवली. त्यावेळी तिघांनी रात्रीच्या अंधारात एकटी प्रवास करणं धोकायदायक असल्याचे सांगून तिला लिफ्ट देतो असे सांगितले. तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवून गाडीत बसली. मात्र तरुणी गाडीत बसल्यानंतर तिघांनी गाडी पीएमजीपी काॅलनीच्या दिशेने न जाता. वाशीनाका, चेंबूर, वडाळा, बैगणवाडी परिसरात गाडी फिरवत राहिले. तब्बल दोन तास ते तरुणीला गाडीत घेऊन फिरवत राहिले. याच दरम्यान तिघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचाः- Mumbai Rains  : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला अलर्ट

तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिघा नराधमांनी तिला रात्रीच्या अंधारात पीएमजीपी काॅलनीजवळ आणून सोडले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत. तिघांनी पळ काढला. घरी आल्यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मावशीला दिली.  तरुणीच्या घरातल्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी मानखुर्द पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मानखुर्द पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून शिवाजीनगर परिसरातून तिघांना अटक केली. रविवारी पोलिसांनी या तिघांना सत्र न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा