कांजूरमार्गमध्ये बंद रिक्षात सापडले तीन दिवसांचे अर्भक


कांजूरमार्गमध्ये बंद रिक्षात सापडले तीन दिवसांचे अर्भक
SHARES

'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीला सार्थक ठरणारी एक घटना कांजूरमार्ग परिसरात घडली आहे. कांजूरमार्ग येथे एका बंद रिक्षात तीन दिवसांच्या स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. एका वाटसरू आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने या नवजात शिशूचा जीव वाचला आहे. भुकेने व्याकूळ असलेल्या त्या अर्भकाची मदत करणारा कुणीच नव्हता. पण वाटसरू अमन हा जणू त्या अर्भकासाठी देवदूत ठरला. आता हे अर्भक पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.

रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबईत राहणारे अमन कांजूरमार्ग परिसरातून जात होते. तेव्हा अचानक त्यांना बंद रिक्षात एका बाळाचा रडण्याचा आवाज आला. बंद रिक्षात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हते. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांना ट्विट करत त्यांच्याकडे मदत मागितली.



अमन यांच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी लगेच उत्तर देत संपूर्ण माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्या बाळाला त्यांनी कांजूरमार्ग (पूर्व) येथील पोलीस स्टेशनमध्ये नेले. सध्या तेथील महिला कॉन्स्टेबल त्या बाळाची देखरेख करत आहे. या घटनेमुळे निराश झालेल्या अमनने ट्विट करत म्हटले आहे की, 'ही एक दुखद घटना आहे. कोणी इतके क्रूर काम कसे करू शकते. सध्या त्या चिमुकल्या मुलीची प्रकृती ठीक आहे. तिचे रडणे थांबले आहे'

अमन यांच्या या कार्यासाठी लोकांनी देखील त्यांची प्रशंसा केली आहे. पूर्वाने ट्विट करत म्हटले आहे की, 'तुम्ही अत्यंत चांगले काम केले आहे. तुम्हाला सर्व सुख लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. तसेच या बाळाची देखरेख चांगली होईल हीच आशा करते'.




हेही वाचा

स्पीडब्रेकर चुकवला, म्हणून तरूणीचा जीवच गेला!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा