बनावट लसीकरणातील आरोपी डाॅक्टर फरार

बनावट लसीकरणप्रकरणी कांदिवली, वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकच टोळीचा हात असल्याचं समोर आलं आहे.

बनावट लसीकरणातील आरोपी डाॅक्टर फरार
SHARES

कांदिवलीतील (kandiwali) हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३९० नागरिकांना देण्यात आलेल्या बनावट लसीकरण प्रकरणी (vaccination scam) पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. यातील एक महत्त्वाचा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार झालेला आरोपी हा डॉक्टर असून याचा या प्रकरणामध्ये मोठा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

बनावट लसीकरणप्रकरणी कांदिवली, वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकच टोळीचा हात असल्याचं समोर आलं आहे.  मॅच बॉक्स पिक्चर्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या कर्मचाऱ्यांची कोरोना लस देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. २९ मे रोजी या संस्थेच्या १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. लस घेणाऱ्या व्यक्तींना कसलीही लक्षणं किंवा त्रास झाला नव्हता. तसंच लसीकरणाचं प्रमाणपत्रही देण्यात टाळाटाळ करण्यात आली होती. या प्रकरणी वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिसरा गुन्हा खार पोलिस ठाण्यामध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा माजी कर्मचारी असलेल्या राजेश पांडे याच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे. संजय गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून टिप्स इंडस्ट्रीज च्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय करण्यात आलेली होती. यासाठी अडीच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, लसीकरण केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला लसीकरणाचं प्रमाणपत्र देण्यात आलं नाही. 

कांदिवलीतील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या शिबिराची सुविधा राजेश पांडे या व्यक्तीने उपलब्ध केली होती. आपण कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं त्याने सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं होते. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

मात्र, लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही. तसंच लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं दिसली नाही किंवा दुष्परिणामही दिसून आले नाहीत, असं नागरिकांनी सांगितलं. ज्या रुग्णालयांच्या नावाने प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आपल्याला बोगस लस दिली गेल्याचं या नागरिकांनी समजलं. सोसायटीतील नागरिकांनी प्रति डोस १२६० रुपये दिले होते. 



हेही वाचा -

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा