मुंबईत काल तीन आत्महत्येच्या घटनांनी हळहळ


मुंबईत काल तीन आत्महत्येच्या घटनांनी हळहळ
SHARES

मुंबईत रविवारी सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर काही तास उलटत नाही. तोच चेंबूर आणि कांदिवलीमध्ये दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. चेंबूरमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. तर कांदिवलीत एका वृध महिलेने इमारतीवरून उडी टाकून आयुष्य संपवले. या प्रकरणी संबधित पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिकतपास करत आहेत.

  हेही वाचाः- मुंबईत 113 टक्के नालेसफाई, महापालिकेचा दावा

चेंबूरच्या सुमन नगरमधील प्रभाग क्रमांक १५५ चे श्रीकांत शेट्ये हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्याच परिसरात शेट्ये हे वास्तव्यास आहेत. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. त्यांचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कित्येक वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याला खोलीत बघायला गेलं असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. अभिषेकने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे शेट्ये कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला आहे. अभिषेकच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचाः- मुंबईत 113 टक्के नालेसफाई, महापालिकेचा दावा

 तर दुसरीकडे कांदिवलीत पद्माबेन रतीलाल धानक (८४) या वृद्ध महिलेने इमारतीच्या १२ व्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. धानक या प्रतिक बिल्डिंग, १२ वा माळा, फ्लॅट नंबर १२४, महावीर नगर येथे रहात होत्या. त्या घरामध्ये एकट्याच असताना त्यांच्या राहते घराच्या खिडकीतून त्याने आत्महत्या केली. मागील १३ वर्षापासून धानक या आजारी आहेत. त्यातच सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीचे कर्करोगाने निधन झाल्याने त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या, मुलीच्या जाण्याने आणि आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा