पाॅलिसीवर बोनसच्या आमिषाने वृद्धांना गंडवणाऱ्या तिघांना अटक

मुलुंड परिसरात राहणारे चंद्रशेखर हरिश्चंद्र उजगरे (७०) हे व्यवसायाने डाॅक्टर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या मोबाइलवर भारती अॅक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनीमधून फोन अाला. कंपनीच्या पाॅलिसीवर मोठ्या रकमेचं बोनस जाहीर झाल्याचं आमिष आरोपींनी चंद्रशेखर यांना दाखवलं.

पाॅलिसीवर बोनसच्या आमिषाने वृद्धांना गंडवणाऱ्या तिघांना अटक
SHARES

भारती अॅक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचं सांगत ज्येष्ठ नागरिकांना गंडवणाऱ्या तिघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. राकेश रामचंद्र शिंदे, रमेश रामदास उगले, मुरलीधर संतोश देशमुख अशी या आरोपींची नावं आहेत. या तिघांनी अशाप्रकारे अनेकांना गंडवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिस तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.

'अशा'प्रकारे फसवलं

मुलुंड परिसरात राहणारे चंद्रशेखर हरिश्चंद्र उजगरे (७०) हे व्यवसायाने डाॅक्टर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या मोबाइलवर भारती अॅक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनीमधून फोन अाला. कंपनीच्या पाॅलिसीवर मोठ्या रकमेचं बोनस जाहीर झाल्याचं आमिष आरोपींनी चंद्रशेखर यांना दाखवलं.

बोनस मिळालाच नाही

हा बोनस हवा असल्यास आरोपींनी वेगवेगळी कारणं सांगून स्टेट बँक आॅफ इंडिया या खात्यामधून टप्याटप्यानं ४ लाख जमा करायला लावले, तर काही रक्कम आरोपींनी रोखीनं घेतली. मात्र कित्येक दिवस उलटले, तरी बोनसची रक्कम न मिळाल्यानं उजगरे यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात राकेश रामचंद्र शिंदे, रमेश रामदास उगले, मुरलीधर संतोश देशमुख या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला.

बरीच सामग्री जप्त

या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ६ मोबाइल, १३ सिमकार्ड, ५ डेबिटकार्ड, होंडा अॅक्टिव्हा (एमएच०४- जीके०४३८) असा ऐवज हस्तगत केला. या आरोपींनी यापूर्वीही अशाचप्रकारचे गुन्हे ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात केले होते. ICICI Prudential, Axis, Reliance, Bajaj, HDFC, Bharti axa, IIFL या इन्शुरन्स कंपनीचे ग्राहक सांगून त्यांनी अनेकांची फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा -

विमानतळावर औषधांच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी

धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा