विमानतळावर औषधांच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी


विमानतळावर औषधांच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी
SHARES

मुंबई विमानतळावर औषधांच्या नावाखाली कॅप्सूलमधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला सीमा शुल्क विभागानं विमानतळावर अटक केली आहे. फ्लंगल शिमजी असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.


पैशांसाठी केलं कृत्य

मूळचा केरळचा नागरिक असलेला शिमजीला पैशाचं आमीष दाखवून ही तस्करी करण्यासाठी केरळहून पनवेलला बोलवून घेतलं. त्या ठिकाणी दुबईतील बाॅसने त्याच्या हस्तकांच्या मार्फत शिमजीला विमानाचं तिकिट आणि ड्रग्जनं भरलेली बॅग पनवेलजवळ आणून दिली. पनवेलहून शिमजी मुंबई विमानतळवार आला. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्याच्यावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.


बॅगेच्या कोपऱ्यात अाढळलं ड्रग्ज

पोलिस तपासात त्याच्या बॅगेतील कोपऱ्यांमध्ये प्लास्टिकनं भरलेली ४५ पाऊच मिळाली. त्यामधील कॅप्सूल्समध्ये Phencyclidine नावाचं ड्रग्स होतं. हे ड्रग्स परदेशातील पार्ट्यांमध्ये नशेसाठी वापरलं जातं.


पानपरागची केली होती तस्करी

चौकशीत शिमजी हा मुंबईमार्गे रियाधला जाण्यासाठी निघणार होता. त्याला ते ड्रग्ज अोमानला सोडण्यासाठी सांगितलं होतं. यापूर्वी त्यानं दुबईच्या बाॅसच्या सांगण्यावरून कतारला पानपराग नेलं होतं. पोलिसांना त्याचा बॅगमध्ये २.५३० किलोचं ड्रग्ज मिळालं आहे. ज्याची बाजारात किंमत ३२.५० लाख रुपये आहे. हे ड्रग्ज शिमजीला मुंबईतून कुणी दिलं, याचा आता शोध घेतला जात आहे.


हेही वाचा -

धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला

मुंबई हल्ल्याची सुनावणी पाकिस्तानात पुन्हा सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा