पोलिस दलात ३३ टक्के महिलांची भरती करावी

वास्तविक ३३ टक्के आरक्षण गृहीत धरल्यास पोलिस दलात सुमारे ७० हजारांच्यावर महिला पोलिस असणे आवश्यक आहे.

पोलिस दलात ३३ टक्के महिलांची भरती करावी
SHARES

महिला या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून उभ्या असताना. पोलिस दलात मात्र महिलांची संख्याही नियमानुसार कमी आहे. 'राज्याच्या पोलिस दलात सुमारे दोन लाख २२ हजार पोलिस असून, त्यामध्ये केवळ २९ हजार महिला पोलिस आहेत. वास्तविक ३३ टक्के आरक्षण गृहीत धरल्यास पोलिस दलात सुमारे ७० हजारांच्यावर महिला पोलिस असणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात महिलांना आरक्षित असलेल्या सर्व जागा भरण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी गृहमंत्र्यांकडे केल्या आहेत.

हेही वाचाः- नागरिकांना गूगल मॅपवर मिळणार प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती

महाराष्ट्र पोलिस दलात येत्या काही दिवसात १२ हजारांची मोठी भरती करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दिशा कायद्यांची अंमलबजावणी व्हावी. या विषयी गृहविभागाने बैठक बोलावली होती. या बैठकित आमदार कायंदे यांनी निवेदन देत,  पोलिस दलात महिलांची संख्या ३३ टक्के व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री देशमुख म्हणाले, 'नवीन १२ हजार पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये महिलांची संख्या ३३ टक्के होईलच याची आम्ही काळजी घेऊ. इतर मागण्यांवरही आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू,' असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचाः- मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

महिला पोलिसांच्या सोयीसुविधा त्यांच्या कामाच्या वेळा व त्यांच्यासाठी शौचालयांचीही कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. पोलिसांसाठी फिरती शौचालय असण्याची आवश्यकता आहे. तसेच सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. महिला पोलिसांना समुपदेशन करण्याच्या पद्धती किंवा समुपदेशन कसे करावे याबाबत विशेष ट्रेनिंग देण्याची गरज आहे, असेही कायंदे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा