अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम अटकेत

 Kandivali
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम अटकेत
Kandivali, Mumbai  -  

कांदिवली - अवघ्या 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर निर्घृणपणे बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. आरोपी दीपक चौहानला पोलिसांनी सोमवारी अटक केली. दिंडोशी येथील न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने आरोपीची 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

आरोपी दीपक चौहानने 5 मार्चला कांदिवलीच्या डॅलेक्सी हॉटेलजवळून अपहरण केले होते. यानंतर तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला कांदिवलीत रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले. या घटनेमुळे कांदिवली परिसरात खळबळ माजली होती. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 6 तुकड्या प्रयत्न करत होत्या. या तुकड्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी करूनही आरोपीचा पत्ता लागत नव्हता. अखेर दीपक चौहान गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना खबरीकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरातमधून दीपक चौहानला अटक केली.

Loading Comments