नशेसाठी रद्दीत विकायचे बोर्डाचे पेपर


नशेसाठी रद्दीत विकायचे बोर्डाचे पेपर
SHARES

दहिसर पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी चार जाणांना अटक केली आहे. हरीश शर्मा (18), अकीब शेख (19) अशी चौघांपैकी दोघांची नावं आहेत. इतर दोन मुलं अल्पवयीन आहेत. चौघंही व्यसनी आहेत. दारू पिण्यासाठी यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे उत्तरपत्रिकांची रद्दी विकून पैसे मिळवण्यासाठी पेपर चोरल्याचं त्यांनी कबूल केले आहे, अशी माहिती दहिसर पोलिसांनी दिली. आतापर्यंत त्यांच्याकडून 330 उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत.

या चोरलेल्या उत्परपत्रिका रद्दीत विकल्या जाणार होत्या. पण पोलिसांना याची खबर मिळाल्याचे कळताच आरोपींनी रद्दी दहिसरच्या जंगलात लपवली. पण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी छापा मारून 330 पत्रिका जप्त केल्या. यामध्ये 181 इतिहासाच्या पत्रिका, 149 सायन्सच्या पत्रिका होत्या.

दहिसर येथील इस्त्रा शाळेत मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून एसएससी बोर्डाच्या 516 उत्तरपत्रिका मंगळवारी चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे एसएसीच्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय? असं वाटत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा