कामासाठी दिलेल्या पैशांचे चॉकलेट खरेदी केले म्हणून, मामीने दिले ७ वर्षाच्या मुलीला चटके

या चिमुरडीवर परळच्या केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या मुलगीची प्रकृती सुधारत आहे.

कामासाठी दिलेल्या पैशांचे चॉकलेट खरेदी केले म्हणून, मामीने दिले ७ वर्षाच्या मुलीला चटके
SHARES

चिकन आणण्यासाठी दिलेल्या पैशाची चॉकलेट आणल्याच्या रागातून एका ४० वर्षीय महिलेने तिच्या सात वर्षाच्या भाचीच्या खासगी भागावर चटके दिल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात त्या महिले विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. मुलीचे हात पाय बांधून तिच्या तोंडात रुमाल कोंबून तिला चटके देण्यात आल्याचे कळते.  ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून तिची मामीचं असल्याचे पोलिसांनी सांगितलं.  

हेही वाचाः- तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या परीक्षेस मुकलात? आता 'या' तारखेला होणार पुर्नपरीक्षा

सात वर्षाची मुलगी ही तिच्या मामीकडे राहते. या मुलीच्या आईचे लहानपणीच निधन झाले असून वडिल दारूच्या आहारी व्यसन गेले आहेत. त्यामुळे पीडित मुलगी ही तिच्या मामाकडे राहते. २९ सप्टेंबर रोजी आरोपी महिलेने मुलीला चिकन खरेदीसाठी ५० रुपये घेऊन बाजारात पाठवले होते. यावेळी पीडित मुलीने शिल्लक पैशांतून कलेजी खरेदी करण्या ऐवजीचॉकलेट खरेदी केले. त्यामुळे आरोपी महिलेने पीडित मुलीचे हात बांधले आणि तिला गरम चमच्याचे चटके दिले. या घटनेमुळे पीडित मुलगी आजारी पडली. तिच्या मावशीच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत, मामी विरोधात तक्रार नोंदवली. मालवणी पोलिसांनी आरोपी महिले विरोधात ३०७, ५०६(ब), नुसार गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला दिंडोशी न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल

या चिमुरडीवर परळच्या केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या मुलगीची प्रकृती सुधारत आहे. मुलीच्या मावशीने आरोपी महिला माझ्या भाचीकडून घरातील सर्व कामं करून घेत असे आणि छोट्या-छोट्या चुकांवरून मारहाण करत असे. शनिवारी, मी मुलीला पाहण्यासाठी आलो असता पीडितेला वेदना होत होत्या. मुलीला खूपवेळा विचारल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तिला मारहाण केल्यानंतर याविषयी कुणाला सांगितले तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा