कोरोना नियमांचं उल्लंघन, ५ बार ठाण महापालिकेने केले सील

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते.

कोरोना नियमांचं उल्लंघन, ५ बार ठाण महापालिकेने केले सील
SHARES

कोविड नियमांचं उल्लंघन करणारे ५ बार ठाणे महापालिकेने सील केले आहेत. यामध्ये दोन ऑर्केस्ट्रा बार आणि तीन रेस्टॅारंट बारचा समावेश आहे.  ठाणे महापालिकेच्या पथकाने सोमवारी रात्री या बारवर धाड टाकली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने या बारवर धाडी टाकल्या.

यावेळी नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा ऑर्केस्ट्रा बार उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला. ॉ माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या ऑर्केस्ट्रा बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा