'ब्लू फिल्म्स' दाखवून केला स्वत:च्याच मुलीवर बलात्कार


'ब्लू फिल्म्स' दाखवून केला स्वत:च्याच मुलीवर बलात्कार
SHARES

मुंबईच्या सांताक्रूज परिसरात एका ५४ वर्षांच्या पित्याने आपल्याच ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. गेल्या ३ वर्षांपासून हा नराधम बाप 'ब्लू फिल्म्स' दाखवून मुलीवर अत्याचार करत असल्याचंही समोर आलं आहे.


काय आहे प्रकरण?

हा नराधम बाप पेशाने खासगी क्लासमधील शिक्षक आहे. पत्नी बाहेर गेल्यावर तो मुलीवर अत्याचार करून आईला सांगू नये म्हणून तिला दम भरत असे. गेल्या ३ वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. काही दिवसांपूर्वी मुलीने हा सगळा प्रकार आपल्या आईला संगितल्यावर आईला हे एेकून मोठा धक्का बसला. शनिवारी या प्रकरणी पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी आम्ही आरोपीला अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सांताक्रूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांतनू पवार यांनी दिली.


'पोलीस दीदी'मुळे आलं प्रकारण बाहेर?

काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेत 'पोलीस दीदी'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'पोलीस दीदी' हा मुंबई पोलिसांचा एक उपक्रम असून या अंतर्गत महिला पोलीस अधिकारी प्रत्येक शाळेत जाऊन 'गुड टच' आणि 'बॅड टच' अर्थात चांगल्या आणि वाईट स्पर्शातील फरक तसेच छेडछाड, लैंगिक शोषणाच्या इतर बाबी विद्यार्थिनींना समजावून सांगतात. या कार्यक्रमानंतर हिम्मत एकवटून मुलीने ३ वर्षांपासून सुरू असलेल्या लैंगिक छळाचा प्रकार आपल्या आईला सांगितल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा-

लहानग्यांसाठी मुंबई होणार अधिक सुरक्षित, प्रत्येक पोलिस ठाण्यात पॉक्सो युनिट

ललिता साळवे लिंगबदलाच्या प्रकरणी सुनावणी लांबणीवरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा