लहानग्यांसाठी मुंबई होणार अधिक सुरक्षित, प्रत्येक पोलिस ठाण्यात पॉक्सो युनिट


लहानग्यांसाठी मुंबई होणार अधिक सुरक्षित, प्रत्येक पोलिस ठाण्यात पॉक्सो युनिट
SHARES

दिवसेंदिवस लहान मुलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना बघता मुंबई पोलिसांनी विशेष पॉक्सो युनिटची सुरवात केली आहे. मुंबईतील प्रत्येक म्हणजेच ९४ पोलीस ठाण्यात असा कक्ष बनवण्यात येणार असून फक्त पॅाक्सो केसेसची जबाबदारी या कक्षावर सोपवली जाईल. सध्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील काही निवडक कर्मचाऱ्यांनाच 'मजलिस' नावाच्या सामाजिक संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या संकल्पनेतून सूरू करण्यात आलेल्या या विशेष युनिटची सूरवात केल्याने बाल लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अर्थात कन्व्हिक्शन रेट वाढेल असं मत मुंबई पोलिसांनी व्यक्त केलं आहे.


कसं असेल पॅाक्सो युनिट?

  • मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात असेल पॅाक्सो युनिट
  • पॉक्सो कायद्यातील नियम-तरतुदींना प्राधान्य
  • प्रत्येक युनिटमध्ये 8 कर्मचारी असतील
  • कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश
  • 24 तास उपलब्ध असतील कर्मचारी
  • कक्षातील कर्मचाऱ्यांना पॉक्सो कायद्याचे विशेष प्रशिक्षण
  • लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या लहान मुलांशी संवादाचे प्रशिक्षण

या कक्षातील कर्मचाऱ्यांना पॅाक्सो कायद्यातील तरतुदी, केसेसचा पाठपुरावा करतानाचे नियम, त्याचबरोबर लहान मुलांची वैद्यकीय तपासणी कशी करायची? मुलांना कोर्टात नेताना पाळायचे नियम या सगळ्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल.

फ्लेविया ऐग्नेस, सदस्या, मजलिस एनजीओ

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यापासून ते निकालापर्यंतची सगळी जबाबदारी ही या कक्षाची असेल. त्याचबरोबर लैंगिक अत्याचाराला सामोरे गेलेल्या मुलांना सरकारी मदत कशी मिळवून देता येईल? याचंही काम याच कक्षाला पहावं लागणार आहे.



हेही वाचा

‘तिच्या’सोबत नेमकं काय घडलं असावं?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा