तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी मांत्रिकाला अटक


तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी मांत्रिकाला अटक
SHARES

१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट १०ने एका मांत्रिकाला अटक केली आहे. नागेश भंडारी(४०) असं या मांत्रिकाचं नाव असू गेल्या काही महिन्यांपासून हा बाबा या मुलीवर अत्याचार करत असल्याचं समोर आलं आहे.


कसा घडला गुन्हा?

ज्या परिसरात हा मांत्रिक राहातो, त्याच परिसरात मुलगी आपली लहान बहीण आणि आपल्या आईसोबत राहाते. २०१२ पासून मुलीचं कुटुंब हे या नागेशला ओळखतं. सांगितलं जातंय की १७ वर्षीय मुलगी ही गतिमंद असून तिला बरं करण्याच्या नावाखाली या मांत्रिकाने मुलीवर अत्याचार केले.

मुलीला बरं करण्याच्या नावाखाली मांत्रिक मुलीला आपल्या घरी बोलावत असे आणि विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार करत असे. अशा प्रकारे मांत्रिकाने मुलीवर अनेक वेळा अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.


कसा आला प्रकार उघडकीस?

ऑगस्ट महिन्यात जेव्हा मांत्रिक मुलीच्या घरी आला, तेव्हा मुलगी घाबरली आणि तो चांगला माणूस नसून त्याला घरी घेऊ नये असं तिने आपल्या आईला सांगितलं. आता मात्र आईला संशय आला. तिने आपल्या मुलीला विचारलं असता, तिने तिच्यासोबतचा प्रकार आपल्या आईला संगितला.

काही दिवसांपूर्वीच या महिलेची दुसरी मुलगी शाळेत जात असताना नागेशने तिलाही अडवलं आणि तिच्या आईला भेटण्यासाठी सांगितलं. मुलीने हा प्रकार आईला सांगताच आई धास्तावली. यावेळी तिने थेट पवई पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरोधात गुन्हा नोंदवला.


पोलिसांनी रचला सापळा

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १० करत असून सोमवारी मांत्रिक नागेश आपल्या मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी सापळा लावला आणि या मांत्रिकाला अटक केली. मांत्रिक नागेशला बलात्कार त्याचबरोबर पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.हेही वाचा

मालाड टोईंग प्रकरण - महिला आयोगाने मागवला पोलिसांकडून अहवाल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा