भिवंडीत ७ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या

पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना शनिवारी रात्री बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती सापडली नाही.

भिवंडीत ७ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या
SHARES

भिवंडीत ७ वर्षीय मुलीची लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून  हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली असून भोईवाडा पोलिसांनी दहा तासांत आरोपीला अटक केली आहे. भरतकुमार धनीराम कोरी (३०) असं या नराधमाचं नाव आहे. भरतकुमार हमालीचे काम करतो.

पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना शनिवारी रात्री बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. रविवारी सकाळी तिचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या  झुडपांमध्ये एका व्यक्तीला आढळला. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय आणि भोईवाडा पोलिस घटनास्थळी पोहचले. जे.जे रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अवघ्या दहा तासांत आरोपीला अटक केली.

पीडितेची आई-वडील खानवळ चालवतात. तेथे आरोपी भरतकुमार जेवणासाठी यायचा. शुक्रवारपासून त्याने खानवळीतील जेवण बंद केले होते. तपासावेळी ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस भरतकुमारची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी गेले. मात्र तो पसार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलाव परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली.


हेही वाचा -

ज्येष्ठ वकिलाच्या घरी लाखोंचा जुगार, आठ जणांना अटक

पाकिस्तानच्या गुप्तहेरास मुंबईच्या नौदल डाॅकयार्डमधून अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय