murder in chembur: चेंबूरमध्ये ७० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या

पाटील यांच्या डोक्यात अनोळखी व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्बल १४ घाव घातले होते. ऐवढ्यावर न थांबता आरोपीने पाटील यांचा दोरीने गळाही आवळल्याचे निदर्शनास आले आहे.

murder in chembur: चेंबूरमध्ये ७० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिसरात राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची निर्घूण हत्या करून तिचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. सजनाबाई धोंडीराम पाटील असे या मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.

हेही वाचाः- Coronavirus pandemic : राज्यात कोरोनाचे ६४२९ नवे रुग्ण, १९३ जणांचा दिवसभरात मृत्यू

चेंबूरच्या जुना रेती बंदर, पेस्तम सागर रोड येथील एसआरए इमारतीत पाटील या रहायला होत्या, १३ जुलै रोजी पाटील या त्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात शेजाऱ्यांना आढळून आल्या, शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पाटील यांचा पुतण्या आनंद पाटीलही होता. सुरूवातीला पाटील या पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याचा तक्र काढण्यात आला. उपचारा दरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. वैद्यकिय तपासणीत पाटील यांच्या गळ्याभोवती वर्णही दिसून आल्याने हा अपघात नसून पाटील यांची हत्या करण्यात आल्याची खात्री डाँक्टरांना पटली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना पाचरण केले.

हेही वाचाः- ‘धारावी पॅटर्न’ मध्ये  पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

पोलिस तपासात पाटील यांच्या डोक्यात अनोळखी व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्बल १४ घाव घातले होते. ऐवढ्यावर न थांबता आरोपीने पाटील यांचा दोरीने गळाही आवळल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी पाटील यांच्या घराचा पंचनामा करण्यासाठी गेले असता. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने व गळा आवळून महिलेची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अखेर टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा