दादर: बंदुकीच्या धाकावर दरोडा, घरात घुसून वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लुटले

मिठाई देण्याच्या बहाण्यानं घरात घुसले होते आणि नंतर बंदुकीच्या धाकावर घर लुटले.

दादर: बंदुकीच्या धाकावर दरोडा, घरात घुसून वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लुटले
SHARES

मुंबईत सध्या गुन्हेगारी वाढत आहे. दादरमध्ये काही चोरट्यांनी बंदुकीच्या जोरावर एका घरात घुसून दरोडा टाकला आणि पळ काढला. सध्या याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर पश्चिम भागात गुन्हेगारांनी बंदुकीच्या धाकावर घरफोडी केली. मिठाई देण्याच्या बहाण्यानं घरात घुसले होते आणि नंतर बंदुकीच्या धाकावर घर लुटले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरोडेखोराने वृद्ध महिलेच्या घरातून एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याचे वृद्ध महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

फिर्यादी महिला कीर्ती महाविद्यालयाजवळील एका रहिवासी इमारतीत राहतात. सोमवारी दुपारी वृद्ध महिला घरात एकट्याच असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला. वृद्ध महिलेने दार उघडतातच आरोपीने तिचा गळा आवळून त्याने पिस्तुलसारखे शस्त्र त्यांच्यावर रोखले. त्यानंतर आरोपीने घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून पलायन केले, अशी तक्रार दादर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरातून सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, गळ्यातील हार असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे वृद्ध महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जबरी चोरी व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ४० ते ४५ वयोगटातील असून त्याने निळ्या रंगाचा शर्ट व पॅन्ट घातली होती, अशी माहिती वृद्ध महिलेने पोलिसांनी दिली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.हेही वाचा

इटालियन महिलेचा विस्ताराच्या विमानात ढिंगाणा, मुंबई पोलिसांनी...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा