७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर होणार बदली, 'हे' आहे कारण

गुन्हे शाखेमध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या (police officers) बदल्या (transfer) याआधी करण्यात आल्या आहेत. आता ७२७ अधिकाऱ्यांची बदली मुंबईबाहेर होणार आहे.

७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर होणार बदली, 'हे' आहे कारण
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाली आहे. या प्रकरणी आणखी पाच आजी-माजी पोलिसांचा सहभाग उघड झाल्यानंतर मुंबई पोलिस दलामध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेमध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या (police officers) बदल्या (transfer) याआधी करण्यात आल्या आहेत. आता मुंबईत ८ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या ७२७ अधिकाऱ्यांची बदली मुंबईबाहेर होणार आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

पोलिस दलातील नियमाप्रमाणे एका जिल्ह्यामध्ये सलग आठ वर्षे सेवा दिल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. या नियमाप्रमाणे मुंबईतील ७२७ अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली करण्यात येणार आहे. यामध्ये ८९ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, २५३ निरीक्षक, ३७५ सहाय्यक निरीक्षक आणि १० उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ३ जिल्ह्यांची बदलीसाठी निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेलं स्फोटकांचं प्रकरणी, मनसुख हिरेन मृत्यू, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक, त्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी आणि पाठोपाठ परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त क्राईम ब्रांचच्या ६५ अधिकाऱ्यांचा समावेश होता. पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तसंच अनेक अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.



हेही वाचा -

मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा