73 वर्षांच्या वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 Agripada
73 वर्षांच्या वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आग्रीपाडा - 73 वर्षांच्या वृद्धाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा नराधम अमेरिकेला पळून गेल्याचे समोर आले आहे.

पिडीत मुलगी वसईत आई आणि भावासोबत राहते. वडीलांचे निधन झाल्याने, आई आणि पिडीत मुलगी घरकाम करते. ही मुलगी नराधमाकडे घरकाम करण्यासाठी गेली होती. या वेळी पत्नी घरात नसल्याचे पाहून नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केला. तसेच याची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चार महिने या अल्पवयीन मुलीवर नराधम बलात्कार करत होता. दरम्यान, पिडीत मुलीचा भाऊ घरी आला तेव्हा या मुलीची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर मुलीला नायर रुग्णालयात दाखल केले असता मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. आग्रीपाडा पोलिसांनी हा गुन्हा वसई पोलिसांकडे वर्ग केलाय.

Loading Comments