अमेरिकी नागरिकांना गंडवणारे ८ जण जेरबंद; प्रतिबंधक औषधांची आॅनलाईन विक्री


अमेरिकी नागरिकांना गंडवणारे ८ जण जेरबंद;  प्रतिबंधक औषधांची आॅनलाईन विक्री
SHARES

अमेरिकेतील नागरिकांना प्रतिबंधक औषधांची आॅनलाईन विक्री करणाऱ्या ८ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली अाहे. इकरामा नासीर मकादम (२६), अरबाज शेख (२०), शहारूख अन्सारी (२०), जुनेद शेख (२२), कदीर सय्यद (२०), अतिफ शेख (२०), आहाद खान (२१), सलमान अब्दुल खान (२३) अशी या आरोपींची नावे आहेत. कुर्ला येथून व्हीओआयपी काॅलद्वारे ही टोळी परदेशातील नागरिकांशी संपर्क साधायची. 


गो आॅटो डीलचा वापर

कुर्लाच्या सारा बिजनेस सेंटरमधील स्पीड टेक्नाॅलाॅजी कार्यालयात अनधिकृत काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांना मिळाली होती. ही टोळी अमेरिकेतील नागरिकांशी व्हीओआयपीद्वारे संपर्क किंवा मेसेज करून संपर्क साधायची. गो आॅटो डील या अॅपच्या मदतीने आपण अमेरिकेतूनच बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून व्हायग्रा आणि इतर प्रतिबंधक औषधांची  आॅर्डर घ्यायचे. त्यांच्याकडून डाॅलर घेत ते पैसे गेट वे च्या प्रोसिजरने रुपयात करून घेतले जात होते. 


लाखो डाॅलर्सची फसवणूक

या काळा बाजारातून या टोळीने परदेशी नागरिकांची लाखो डाॅलर्सची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत या टोळीच्या मुसक्या अावळल्या अाहेत. या गुन्ह्यात इतर आरोपींचाही सहभाग असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.



हेही वाचा- 

एकतर्फी प्रेमातून तरुणीची बदनामी करणाऱ्याला पुण्यातून अटक

फेसबुक वापरताय? मग ही बातमी वाचाच




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा