अंधेरीत २३ वर्षीय एअर होस्टेसवर सामुहिक बलात्कार

दोघांनी मालाडच्या ‘गॅलेक्सी ऑफ स्टार बार’मध्ये मद्यपान केले. दोघेही इतके नशेत होते की, त्यांना चालण्याची सुध ही नव्हती. घरी अशा अवस्थेत गेल्यास घरातले ओरडतील. त्यामुळे दोघेही एका हाँटेलमध्ये गेले.

अंधेरीत २३ वर्षीय एअर होस्टेसवर सामुहिक बलात्कार
SHARES

अंधेरीतील एका नामकिंत एअरलाइन्स कंपनीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी परिसरात उघडकिस आली आहे. या प्रकऱणी एमआयडीसी पोलिसांनी तरुणीच्या कंपनीत सिक्युरिटी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या स्वप्नील अरुणकुमार बडोनिया या २३ वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. प्रथमदर्शी स्वप्निलचाच या गुन्ह्यात सहभाग निश्चित झाला असून इतर दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. मात्र वैद्यकिय अहवालानंतर तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला आहे का ? ते समोर येईल. असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.


दारूच्या नशेत अत्याचार

हैद्राबाद येथे कंपनीच्या कामानिमित्त गेलेली तरुणी सोमवारी मुंबईत दाखल झाली. त्यावेळी कंपनीच्या कारमधून तिला घरी सोडण्यासाठी सिक्युरिटी अधिकारी स्वप्नील बडोनिया हा आला होता. त्यावेळी तरुणीने मालाड येथील घरी सामान ठेवून स्वप्निलजवळ मद्यपान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दोघांनी मालाडच्या ‘गॅलेक्सी ऑफ स्टार बार’मध्ये मद्यपान केले. दोघेही इतके नशेत होते की, त्यांना चालण्याची सुध ही नव्हती. घरी अशा अवस्थेत गेल्यास घरातले ओरडतील. त्यामुळे दोघेही एका हाँटेलमध्ये गेले. मात्र त्या ठिकाणी त्यांना रुम देण्यास मॅनेजरने नकार दिला. अखेर स्वप्नील हा तिला घेऊन त्याच्या अंधेरीतील शेरे-ए-पंजाब, कमलेश अपार्टमेंटमध्ये घेऊन आला. त्यावेळी खोलीत स्वप्निलचे दोन रुममेट आणि इतर एक महिला हजर होती. मध्यरात्री स्वप्निलने नशेत असलेल्या तरुणीवर तिच्यावर केले. मंगळवारी दारूची नशा उतरल्यानंतर तरुणीला वेदना असह्य झाल्या, त्यावेळी तिला तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे लक्षात आले.  

 

केईएम रुग्णालयात दाखल

घरी परतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानुसार घरातल्यांनी तिला उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत स्वप्निलला अटक केली आहे. स्वप्निलच्या मित्रांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. लवकरच वैद्यकिय अहवालानंतर त्यांचा या गुन्ह्यात आहे की नाही ते स्पष्ठ होईल. त्यानुसार पुढे पोलिस कारवाई करतील असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा -

उपनगरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, अर्ध्या तासात ६ गुन्हे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा