भररस्त्यात महिलांकडे पाहून अश्लिल हावभाव, एकाला अटक

दोन महिलांनी आरोपीच्या वाहनाचा नंबर नोंदविला होता. या नंबरच्या सहाय्याने आरोपीला नटराज बारजवळ अटक करण्यात आली आहे.

भररस्त्यात महिलांकडे पाहून अश्लिल हावभाव, एकाला अटक
SHARES

मुंबईच्या घाटकोपर येथील विद्याविहार परिसरात भररस्त्यात महिलांना पाहून अश्लिल हावभाव करणाऱ्या एका माथेफिरू तरुणास टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. बिट्टू पलसिंग प्राचा (२७) असे या आरोपीचे नाव आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करून त्याने प्रायव्हेट पार्ट्स दाखवत महिलांचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचाः- बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांनी आरोपीच्या वाहनाचा नंबर नोंदविला होता. या नंबरच्या सहाय्याने आरोपीला नटराज बारजवळ अटक करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर लता सुतार यांनी सांगितले की, आरोपी हा सफाई कामगार असून जेव्हा त्याने महिलांसोबत अश्लिल हावभाव केले तेव्हा तो त्याच्या मित्राची गाडी चालवत होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ) (लैंगिक छळ), ५०९ (शब्द, हावभाव किंवा एखाद्या स्त्रीच्या विनम्रतेचा अपमान करण्याचा हेतू ) आणि ३३६ (इतरांचे जीवन धोक्यात आणणारे किंवा वैयक्तिक सुरक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः-मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार

महाराष्ट्रात महिलांवरील गुन्ह्यांचा हा वाढता आलेख पाहता. हे अत्याचार नियंत्रणात आणण्यासाठी व महाराष्ट्रात दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गृहमंत्र्यांनी नुकतीच एका विशेष बैठक बोलावली होती. यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना आणि त्याच्या अंमलबजावणीचे निर्णय घेण्यात आले. याबैठकीला गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई खासदार सुप्रिया सुळे, आ. यामिनी जाधव, आमदार डॉ. मनीषा कायंदे, माजी आमदार श्रीमती विद्या चव्हाण, अति.पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्रसिंह अति. पोलिस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिशा कायद्याच्या माध्यमातून महिलांसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे. महिला संघटना तसेच तज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्यात येणार आहे अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी बोलतांना दिली. सर्व सूचनांचा विचार करून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा